तु ये पुन्हा माझ्यासाठी..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, June 21, 2012, 11:24:03 PM

Previous topic - Next topic
तु ये पुन्हा माझ्यासाठी ये..!!

न करमत आहे तुला न राहवत आहे मला
हवेतला गारवा बनुन तु ये..!!

स्वप्नांत रोज यायची तु दबक्या पावलांनी तशीच  पैंजण्यांचा आवाज करत ये..!!

थरथरतंय अंग माझे सावरायला तु ये..

जागतो मी रात्र रात्र निशा बनुन तु ये
प्रेम तु ही करतेस अन मी ही
मनास माझ्या मुग्ध करावयास तु सुगंध बनुन ये..!!

डोळयांत पाणी तुझ्याही
आणि भिजतो आहे मी ही
अधुरया राहील्या कविता माझ्या हरवले आहे शब्दही
लेखणी बनुन ये..!!

खुप आठवण तुझी येते शोना
तु माझ्यासाठी परत ये

बघ माझी दैना काय जाहली
डोळयांत आतुरता पाहण्याची तुला
मुका झालो आहे मी रडतो आहे एकटयात
अश्रु पुसुन आधार दयावया तु ये..!!

माझ्या सोबत रात्र रात्र बोलणारी शोना तु परत ये..!!
-
प्रशांत शिंदे

केदार मेहेंदळे