निवेदिता..

Started by Rohit Dhage, June 24, 2012, 02:40:56 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

निवेदिता.. आधी कुठल्याश्या शाळेच्या पुस्तकात धड्याचं नाव ऐकलेलं.. भगिनी निवेदिता.. आणि फारसं common  नसलेलं त्यामुळे धड्याबरोबरच संपलेलं असं नाव..
पण एकदा या नावाची मुलगी सत्यात आली.. मैत्रीण म्हणून.. शाळेच्या एका वर्षासाठी..  इयत्ता आठवीसाठी..
इयत्ता आठवी.. कुणी जर विचारलं.. तुला आठवणारं किंवा तुझं आवडतं वर्ष कोणतं रे.. माझं उत्तर असेल.. आठवी.. मला माझी कुठलीच इयत्ता एवढी आठवत नाही जेवढी माझी आठवी आठवते..
ह्या वर्षात मी पहिल्यांदाच वर्गाचा monitor झालो होतो.. ह्याच वर्षी माझ्या दोन्ही आजोबांचं वाईटही  झालं.. याच वर्षी मी खूप दंगाही केला.. आणि जे काही क्षण घालवले.. ते संस्मरणीय असेच होते..

आमच्या कारखान्यावरची सगळी पोरं गावातल्या शाळेतच जायची.. शहरातली लांब पडते म्हणून.. आणि मारकुट्या बापाच्या डोळ्याखालीच राहतील म्हणूनही..
पण आम्ही थोडे हुशार.. थोडे समजणारे.. थोडे असणारे.. गावातल्या पोरांच्या नादी लागून गल्ल्यातून गोट्या खेळण्यापेक्षा पोराला शहरात पाठवलेलं केव्हाही बरंच.. एक typical आई-बापांचा विचार.. असे शहरात शाळेला घातलेले काही घासू, काही हुशार पोरं.. तर काही इशांत अवस्थी..

आमच्या कारखान्याला एक बस असायची.. शहरात जाणारी.. त्याला २ पास.. एक विद्यार्थी लाल रंगाचा पास तर एक प्रौढ पांढऱ्या रंगाचा पास..
पोरं पोरं धिंगाणा घालत जायची.. पोरींची कुचूकुचू चालायची.. माझी ३ वर्ष झाली शहरातल्या शाळेत.. पण routine मधे फारसा फरक काही आठवत नाही..

मग ८ वी उजाडली.. कुणी सोडून गेलेलं आठवत नाही पण २, ३ वाढलेलीच .. त्यात एक बाली, एक कानडी पोरगा आणि निवेदिता..
बाकीच्या दोघांचं कौतुक एवढं नाही कारण ती सगळी कायमची इथलीच.. निवेदिता पुण्याची.. धनकवडीला राहिलेली.. हुशार मुलगी.. अभ्यासातही.. आणि व्यवहारातही.. बाकीच्या दोन भावंडांवर खूप प्रेम करणारी..
भावाचं विमान तुटलेलं म्हणून स्वतःचं विमान कुर्बान करणारी.. लहान वयात माणसं कशी जपावी अचूक ओळखणारी.. निवेदिता..
तिच्या भावाच्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी शहरात जाणारी मंडळी गोळा केलेली.. ओळख करून दिलेली.. 'तू आता ह्यांच्याबरोबर जायचं हं'.. काळजीवाहू बापाची पुढची तयारी.. आम्ही कॉलनीतली पोरं जरा गांगरलेलीच.. एक तर gift मनात आलो तर देणारी.. इथे return gift मिळालेली.. आमच्या लक्षात राहणारा वाढदिवस तिच्या घरी झाला..

दोन दिवस ती सुषमा, बाली आणि माझ्याबरोबर फिरली.. त्या सगळ्या पुढे.. मी आपला मागे.. आम्हाला इकडे बल्लू आणि सागरची सवय.. आम्ही पोरं पण करंटीच.. नेहमी कुणीतरी, कुणाशीतरी बोलत नसायचं.. त्यावेळी माझं नेमकं ह्या दोघांशी वाजलेलं.. त्यामुळे मी सुषमा आणि बालीच्या ओळखीनं नव्या ग्रुप मधे घुसालेलो.. घुसायच्या प्रयत्नात असलेलो.. ते दोन दिवस जरा formal  गेले.. आणि नंतर.. नंतरची आठवते फक्त मज्जा..

आम्ही त्या एक वर्षात खूप चांगले, खूप स्मरणीय असे क्षण घालवले.. भांडलो काय.. फडे डॉक्टरच्या वर्हांड्यात खेळलो काय.. एकत्र अभ्यास काय केला.. वर्गाचे दोघे monitor काय झालो.. वर्गात तर आम्ही एकमेकांचे भाऊ-बहिण सांगायचो.. तिला बरं जावं म्हणून.. मला आठवतंय.. वर्गात सुरु होणारे special इंग्लिश क्लासेस तिच्या आग्रहानेच मी लावलेले.. आणि तिथे जे शिकलो ते आजही माझ्या कमी येतंय..
monitor असताना कसले तरी पैसे गोळा करायचे होते.. तिचा गणित अचूक असलेलं.. आणि माझं सरांकडून ढिसाळ कारभार म्हणून ओरडा खाल्लेलं.. अजून आठवतंय..
एकदा सागरच्या आईकडून माझ्यासाठी तिनं ओरडा खाल्लेला.. हो.. ते ही आठवतंय..
पळत जाऊन एस. टी. काय पकडायची.. ते दिवसच लई भारी..!!
त्यात नंतर नंतर मी आणि निवेदिता खूप जवळचे मित्र- मैत्रीण झालेलो.. सुश्माही म्हणायची.. तुला काय.. तुला तीच जवळची.. अर्थात तेव्हा तिचं आणि निवेदिताचं वाजलेलं असायचं..!

इतकी छान मैत्री.. मी पुन्हा मुलांच्यात बोलावूनही गेलो नाही.. मी त्यांच्यातलाच झालो.. ८ वीचं वर्ष संपलं.. माझी ८ वीलाच सुरु झालेली सेमी-इंग्लिशही  सुटली.. पुण्याला flat चा ताबा मिळाला.. आता पुढचं शिक्षण पुण्याला होणार होतं.. जाता जाता शेवटचं लोभसवाणं वर्ष संपलेलं होतं.. जाताना थोडं वाईटही वाटलेलं.. थोडं पुण्याचं कुतूहल असलेलं.. निघायच्या अगोदर निवेदिता सोडवायला यावी खूप वाटलेलं.. आणि बल्लू आलेला.. ती तर कधीच गावाला गेलेली.. परत कधी आलो तर भेटेल..असं मनात म्हटलेलं.. आणि पुण्याला सुटलेलो..

परत आठवतंय.. सुट्टीत कारखान्यावर आलेलो.. बल्लुला, सागरला भेटलेलो.. पण तिचं घर मोठ्या बापाचं.. तिच्या घरावरून गावच्या मंदिरात गेलेलो.. तिच्या दाराकडे पाहत पाहत.. घरी का नाही गेलो.. आता खरंच कळत नाही.. एकदा घराबाहेर गेलेलो.. तेव्हा आईनं सांगितलेलं.. निवेदिता येऊन गेलेली.. परत तिच्या घरी धाडस करून गेलेलो..तेव्हा ती घराबाहेर गेलेली.. तिच्या आईला सांगितलेलं.. तिला खालच्या बागेत पाठवा! मला भेटायचंय तिला!! आणि ती न आलेली.. माझी तिची भेट परत झाली नाहीच...

आज इतकी वर्ष झाली.. ८ ..९ .. १० .. १० आणि ५ १५..१६.. १७... ९ वर्ष झाली.. पण फारशी मनातून न विसरलेली.. अगदी कालचीच गोष्ट वाटतेय इतकी जपलेली.. अलीकडेच facebook ला दिसलेली.. तिकडेही famous  झालेली.. पोरगीच मस्त! जाईल तिथं राज्य करणारी.. डॉक्टर झालेली.. निव टोपण नाव पडलेली.. ओळख काढायला गेलेलो पण जुनं आठवायला घाबरलेली.. तेव्हा आपण ८ वीत होतो रे.. काही कळत नव्हतं.. आता तू कसा असशील.. कसल्या स्वभावाचा असशील.. आणि फारसं जाणून न घेता बोलणं तोडणारी.. मागची पाऊलं रेतीत विरणारी आणि पुढची हृदयात रुतवणारी.. निवेदिता..

- रोहित

Pramod Ingale

Kharach wachun anand zala. wachatana balpanat gelyasarkhe watale.kuthetari kahitari saltay asach watale.
keep it up.

Vaishali Sakat

"मागची पाऊलं रेतीत विरणारी आणि पुढची हृदयात रुतवणारी.........." Khupach Zhaan Lekh.... :)

Rohit Dhage

Thanks vaishali.. btw tuza call karaycha kay zala

Vaishali Sakat

Kelela me call Amhi 07th Octomber la bhetelo.......eka coffee shop madhye.......

Rohit Dhage


Vaishali Sakat


Rohit Dhage

#7
chal.. phir bhi thik he.. atleast v4 tari..

sai patil