पाउस................... नव्या उमेदीचा

Started by sindu.sonwane, June 24, 2012, 07:29:49 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

पाउस...................  नव्या उमेदीचा

तारुण्याच्या उंबर् ठया वर असताना
तू जरा जास्तच आवडतोस
तारुण्याच्या कश्याला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर
तू हवासा असतोस
तापलेल्या धर्तीवर बरसणाऱ्या
तुझ्या टपोर्या थेंबानी सर्व आसमंत दरवळतो
ढग दाटून येतात, वीज चमकते, काळोख होतो
सर सर बरसणाऱ्या तुझ्या सरीना अंगावर घेत
एक वेगळच गुंगून ओठ वर येतो
अचानक पाय थबकतात आणि मनाला लागून जाते
एकट भिजनायापेक्षा सोबत  कुणीतरी हवस वाटते
वीज चमकतच अलगद जवळ घेणार
लटक्या रागाने आपण दूर व्हावं
आणि मेघ गरजताच घट्ट त्याला मिठी मारावी
इतक्या त्याच्या जवळ राहावं कि वाराही लाजेल
हळूच त्याचे शब्द कानावर पडावे
"पुन्हा अशी दूर नको जाउ स
आणि गेलीस तरी हा पाउसच आपल्याला
जवळ करील अगदी जन्मोजन्मी साठी"
आनंदाने मन वेडे व्हावे
आणि खरच मनाला लागून जाते
कुणीतरी अस असाव जीवनाला एक नवी उमेद देणार
तुझ्या सोबतीने बेफान होऊन पाय थिरकत राहावे
अंग अंग मोहरून जावे आणि अलगद ओठातून
तुझ्यासाठी  शब्द फुटवे "पाउस हा असा एका नव्या उमेदीचा"
                                                                                       सिंदू