स्वप्न

Started by प्रशांत नागरगोजे, June 27, 2012, 08:55:53 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

आज ती स्वप्नांत आली
तशी ती रोजच येते
पण आज काही वेगळंच होतं
तोच चेहरा....
जो हृदयाचा श्वास होऊन बसलाय
तेच डोळे...
ज्यात पापणी न लवता मी पहायचो
तेच ओठ...
ज्याची नेहमी आस असायची

ती म्हणाली,
किती दिवस झाले रे
येत नाही का तुला आठवण माझी
मान्य आहे, मी दूर आहे
पण तुला काय झालं, जवळ यायला
तुझी खूप आठवण येते रे ...

मी म्हणालो,
दिवस सरले, पण मनांत अन् डोळ्यांत
तू तशीच आहेस सखे....माझीच
तुझ्या खूप जवळ आलोय ग
पण तुला हे उमजेनाच
एक दिवस कळेल तुला सारे
तूच तेव्हा म्हणशील
कसं सहन केलास रे
हा दुरावा....इतक्या जवळ असूनही
तुझी खूप आठवण येते ग

क्षणांत ती अदृश्य झाली
दचकून जागा मी झालो
डोळ्यांसमोर तोच चेहरा ...
तेच डोळे...
अन् दुरावा....काही क्षण राहिलेला
                        -आशापुत्र     

www.prashu-mypoems.blogspot.com

केदार मेहेंदळे