सांग तू आता तरी

Started by vidyakavita, June 28, 2012, 10:59:51 AM

Previous topic - Next topic

vidyakavita

  सांग तू आता तरी

गेलीस सोडूनी तू मला
      केव्हा कधी कळेना
सांग तू आता तरी
     भेटीन मी केव्हा मला ?

ओळखीचे वाटे सारे
    हृदय सदा हे स्पंदनारे
कल्लोळ तो तुझा परी
   आता मला स्मरेना
मग सांग ऐकेन मी
   केव्हा कधी कळेना  ?

माझी तुला म्हणू मी कसे
   हा हक्क न आता उरे
रिक्तता माझ्यातली
  सांग मी देवू कुणा ?

नजरेत लाज सलते
       रुतते भीती अजुनी
मझं प्रेम तू करावे
      चूकभूल माफ द्यावी
आहे उभी अजुनी
      मी आरशासामोरी
सांग पाहशील तू मला
    केव्हा कधी कळेना ?

              Vidya Anand