आनंद वेदना

Started by कुसुमांजली, June 29, 2012, 10:01:52 PM

Previous topic - Next topic

कुसुमांजली

सुख-सागर दृष्टी पथातच होता
तेव्हा आला दुःखाचा डोंगर आड
का  सोन-किनार लाभावी म्हणून
मुद्दाम गेलाय सुर्य ढगा आड़

आरशाला पडलेल्या बिलोरी स्वप्नाची आहे गम्मंत मोठी न्यारी
असंख्य तुकड्यान  मधे ही जपतोय त्याचीच अवीट गोडी

लाटांना असत नाही तमा किनारीच्या निवाऱ्याची
कधी मृदू वाळु लाभे तर कधी संगत कपारीची

मर्म हे जाण तु, मना, समजून घे मुक्तीचा साक्षात्कार
घे झोके अलिप्त होऊन पाही भरती-ओहोटी एक समान   


केदार मेहेंदळे

लाटांना असत नाही तमा किनारीच्या निवाऱ्याची
कधी मृदू वाळु लाभे तर कधी संगत कपारीची



chan vichar.