" दुखाची सांगड़"

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 01, 2012, 02:28:28 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

    " दुखाची सांगड़"

आयुष्याची सांगड़ घालताना ,
शब्दाची सांगड़ कधीच जमली नाही .
दुखाचा पदर पसरून जगताना ,
आयुष्यात आता जगणंच उरलं नाही.

दुखाचा चढ़ उतार पार करताना,
सुखाची वाट कधी दिसलीच नाही.
तेजाळणारी अस्पृश्यतेची समई,
जन्मापासून कधी विझलीच नाही.

केवळ दुखाचीच वाट,
आमच्या वाट्याला आली.
उपासमार तर आमच्या,
पाचविलाच होती पुजली.

जगण्याला नवी उम्मेद मिळाली,
जिवनाला खरा अर्थ मिळाला.
त्यावेळीही पदरी दुःख आलं,
कारण समोर मृत्यु उभा ठाकला.

आईची मायेची साखर,
फ़क्त त्यांच्याच वाट्याला होती.
पोटाची आग कधी विझलीच नाही,
उपासमार तर पाचवीलाच पुजली होती.

कित्येक वर्षे निरंतर चालत राहिलो,
शब्दाची सांगड़ कधी जमलीच नाही.
उन-पाउस ख़त होतो,
दुखाची सांगड़ कधी जमलीच नाही.

                           

केदार मेहेंदळे

#1
Hmmm.... 
Kavita chan aahe....pan hi prernadayi kavita aahe ka?......

Vaishali Sakat

आईची मायेची साखर,
फ़क्त त्यांच्याच वाट्याला होती. :'( :'( :'(