धनुष्य मिळेल का? (गमन)

Started by केदार मेहेंदळे, July 02, 2012, 11:17:43 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

एक म्हातारा पिकलेला
म्हातार पणानी थकलेला
आयुष्याचा भार उचलून
कमरेतून पार वाकलेला

पाहून वाकलेला म्हातारा
एक टवाळ विचारे त्याला
"बोल म्हातार्या विकतोस
धनुष्य हे केवढ्याला?"

ऐकून थांबला म्हातारा
हसत म्हणाला टवाळाला
"वाट बघ मिळेल फुकटच
धनुष्य तुलाही मिरवायला"


केदार...

मैत्रीण (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9050.msg29734.html#msg29734


भ्रम (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8930.0.html

shashaank



कुसुमांजली.