सांगरे कधी येशील तू .

Started by swaraj, July 14, 2012, 03:37:16 PM

Previous topic - Next topic

swaraj

सख्यारे सजणारे  मनमोहनारे
सांगरे कधी येशील तू ...............

ग्रीष्म गेला वसंत आला
मोर बघ नाचू लागला
रिम झिम सारी शिंपु लागल्या
गंध मधुर दरवळू लागला
सांगरे कधी येशील तू ...............

घन काळे दाटुनी आले
थंड गार वारे वाहू लागले
हिम गारा  बरसू लागल्या
विजा मंद मंद चमकू लागल्या
सांगरे कधी येशील तू ...............

चिंब चिंब रान झाले ओले
फुले पाना पानात झोका खेळे
थेंब थेंब तुषार थंड ओले
पक्षी गोड प्रेम गीत बोले
सांगरे कधी येशील तू ...............

मन धुक्यात हरवून गेले
हिरव्या गालिच्यावर विसाऊ लागले
पारिजात सडा पडूनही  गेला
रातराणी बघ फुलण्यास झाली
सख्यारे सजणारे  मनमोहनारे
सांगरे कधी येशील तू ...............

..................स्वाती गायधनी .......................

Swati Gaidhani (swaraj )