" प्रेम "

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 14, 2012, 03:52:55 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


" प्रेम "

पुरे झाले चंद्र सूर्य,
पुरे झाला तारा.
पुरे झाले नदी नाले,
पुरे झाला वारा .

मोरासारखा छाती काढून उभा रहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा.
सांग तिला तुझ्या मिठीत ,
स्वर्ग आहे सारा ........

शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद ,
करतील काय....
डांबरी सडकेवरती कधी मेघ,
इंद्रधनू बंधतिल काय ...

श्रावणातल्या मेघासारखा नुसताच ,
हवेत राहशील फिरत ....
जास्तीत जास्त बारा महीने ,
बाई बसेल झुरत ...

नंतर तुला लगिनचिट्ठी,
आल्याशिवाय राहिल काय ???

म्हणूनच सांगतो जागा हो ,
जान्यापूर्वी वेळ,
प्रेम म्हणजे नव्हे,
भातुकलीच्या अडीच अक्षरांचा खेळ....

प्रेम म्हणजे जंगल बनुन जळत राहणं,
प्रेम म्हणजे वणवा बनुन जाळत राहण.

प्रेम कर भिल्ला सारखं ,
बाणावरती खोचलेलं.
अन मातीमधे उगवून सुद्धा,
मेघापर्यंत पोहोचलेलं.....   

          कविवर्य - वि . वा. शिरवाडकर

BHAGWAT TUPE

BEST POEM ......SIR HATS OFF 2 U

केदार मेहेंदळे


kashinath Bhimanavaru

i like it very very much................................

sylvieh309@gmail.com

Bolayala khup sopp asat pan kahi janana nahi karat yet bhillansarakha prem.