प्रेम प्रतीक्षा

Started by sindu.sonwane, July 15, 2012, 01:40:41 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

प्रेम प्रतीक्षा 
सायंकाळची वेळ होती सूर्य पृथ्वी पासून दूर जात होता
जाता जाता लाल शालू तिच्यावर ओडून गेला
उद्या परत भेटेन म्हणून सांगून गेला
त्या निशब्द सायंकाळी मानाने माझ्या हे काव्य केले
मलाच माझे हसायला आले हे भलतेच वेड मला कुटून जडले
सळसळून आलेल्या वारयाने अलगद माझ्या कानात म्हटले
"तुलाही कुणावर प्रेम झाले"
मोरपंखाचा हळूच स्पर्श व्हावा अनंत गुलाब काळ्यांचा वर्षाव व्हावा
असे  हे वारयाचे गुणगुणे झाले
नि कालचे तुझे शब्द परत माझ्या कानी पडले
माझा हात तुझ्या हाती होता
माझ्या नजरे समोर तुझीच नजर होती
थोडी घाबरलेली पण स्वतःच्या मतावर ठाम असणारी
स्मित हासेय करत ओठातून तुझ्या शब्द आले
"खूप वाट पहिली तुझी आता पुन्हा अशी वाट पाहायला नको लाउस
जीव जडलाय माझा तुझ्यावर करतेस  का प्रेम तुही इतकाच माझ्यावर?"
तुझ्या प्रश्नासावे मोहरून गेली मी
माझ्या लाजून हसण्याने तुला मात्र माझ्या मनातले सर्वच कळले
मी जणू स्वर्गात आहे असे मला भासू लागले
तुझी नजर माझ्या नजरे वरून हटेनाशी झाली
किती तरी प्रेम करते मी तुझ्यावर परत परत ती मला खुणावत गेली
तुही काल परतीच्या वेळी बोलून गेलाश
उद्या परत भेटेन.
पण हात हातातून सोडवत नव्हते
परतीच्या वाटेकडे पाऊल वळत नव्हते
रात्रही जणू जगण्यातच गेली
दिवसही पूर्ण तुझ्या आठवणीतच गेला
सायंकाळी मात्र तू बरोबर आलस
पण परत तू खूप सारया आठवणी देऊन  निघून गेलास उद्याच्या भेटी साठी. 
"भेटशील न रे मला पुन्हा आयुष्यभरासाठी
कि असाच प्रत्येकदा सोडून जाशील
युगानु युगे  सूर्य जसा पृथ्वीला  कधीही न एक होण्यासाठी" .                                                                                                                                                     सिंदू