एका थेंबाची गोष्ट

Started by kalpakumar, July 21, 2012, 05:42:47 PM

Previous topic - Next topic

kalpakumar





पावसाळ्याच्या कुंद सकाळी
पाहिले  मी त्यास पानावरी
पहाटेच्या पहिल्या प्रहरी
चमकत होता हिऱ्या परी


स्पर्श करण्याच्या मोहाने
हळूच टिपले त्यास
पण हात पानास लागून
निसटला तो पानावरून

मिळाला आपल्या सवंगडी मित्रांना
आणि लागला त्यासोबत नाचण्यास
थेंब थेंबाचा झाला तो गोंधळ
हसत खेळत एकमेका ढकलत
झाला कि हो छोटासा ओघळ


गवतातून, झुडुपातून झेपावत
तप्त धरतीचा सुंगंध हुंगत
दगडा धोंड्यावरून उड्या मारत
पोहचला तो जवळच्या झऱ्यात

छोट्या मोठ्या कीटकांना चुंबत
अजूनही आपल्यातच गुंग
झाला तो फार अवखळ 


नदीच्या कोलाहत  गेला
तो एका प्रचंड माश्याच्या मुखात
लगेच निसटला कानातून पाण्यात


आता वेग मंदावला होता
होती सर्वत्र शांतता
हवेत फारच उष्णता
आसपासचे सवंगडी
झाले दिसेनासे बघता बघता


सहज बघितले वर त्याने
हाच का तो मेघ
जिथे जाहला होता माझा जन्म
आतुरले माझे अंतकरण
जाण्यास तेथे पुनश्च
आणि बनण्यास स्वच्छंद थेंब पुन्हा

kalpana Bandiwdekar  July 21st 2012

केदार मेहेंदळे


kalpakumar

thanks..this was my first attempt and other than close family nobody knew about it.. so its nice to know that you liked.

how about you ? have you posted any of your poems ?  would love to read them.

all the best :)

kalpana

विक्रांत

कल्पना  सुरेख !
विक्रांत

Harshada Pote



मिलिंद कुंभारे