पहिला पाऊस ..

Started by RamKumar, July 28, 2012, 04:00:18 PM

Previous topic - Next topic

RamKumar

पहिला पाऊस ..

पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण ...
आजही घालतात साद मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...
तुझ्या आठवणित गुंफतात मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...

नकळत हात तुझा हातात येता,
उमललेली ह्दयाची कळी ...
वाढलेले ह्दयाचे ठोके,
तुने करिता चावट खोडी ..

पावसात चिंब भिजताना,
तुला पाहन्याचा तो आनंद ...
ढगांच्या गर्जनाने तुझा,
माझ्या मीठीत येण्याचा तो प्रसंग ...

तो थेंब पावसाचा, तुझ्या गालावरती थांबलेला ..
घेताना मीठीत तुला, माझ्या ओठांनी मी टीपलेला .. 
सोबतिला असलेला मातिचा ही गंध,
अजूनही आहे श्वासात माझ्या, तुझ्या गजर्‍याचा सुगंध .. 

कितीतरी अशा आठवणि, आनी बरेच असे क्षण,
पडत असतो पाऊस बाहेर, आनी आतमध्ये रडते माझे मन ..

असा हा पाऊस वेडा, नेहमिच तुझी आठवण घेऊन येतो,
होताना एकरूप मातीशी, माझ्या पापण्यांना ओल करून जातो ..

पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण .....................
                                                 ( भुषण रामटेके )
   

केदार मेहेंदळे


RamKumar


कवि - विजय सुर्यवंशी.

 :)  khupach chhan pahilya pavsachya athvani jagya zalya... :)

RamKumar

Thanks कविवर्य - विजय सुर्यवंशी.....
mulat ti lihalich aahe aathwani tajya karnya karita aani janchya sobat ajun asa ghadla nahi tyana swapna ranjan karnya karita   ;D

Kiran Mandake

 :( परंतु जेव्हा त्या पहिल्या पावसामधील आपली पहिली स्वप्नसुंदरी आपणास सोडून जाते ........तेव्हा तोच पूस आपला शत्रू बनतो आणि जे डोळे या पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहायचे तेच निस्तेज डोळे......पावसासारखे वाहायला लागतात.... ते पावसाचे थेंब अगदी तेजाबासारखे भाजतात ..........जो पाऊस अगदी स्वच्छ पाणी वाटायचा तो आता चिखल बनवणारे पाणी वाटते.......पण खूप खूप छान कविता ....sorry but it's my point of view..........don't mind....

RamKumar

Thanks Kiran  :)

माझ्या मते प्रत्येक गोष्टीला चांगली आनी वाईट बाजू ही असतेच. दुःखद क्षण आठवून दुख़ करन्या पेक्षा आनंदी क्षण आठवून हसलेल बर.
What ever happened in past, you can't change it. Yeah but you can try to make it right.. otherwise leave it and just enjoy the present.
Harivansh Rai ji ne kaha hi hai "jo bit gayi so bat gayi"  ;)