आंब्याचं झाड (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, August 01, 2012, 03:12:39 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

आंब्याचं झाड

मी पाहिलं होतं त्याला
-    छोटसं रोपटं असतांना
-    वाऱ्यासोबत मजेत डौलतांना
-    लहानश्या मुलाप्रमाणे खुदुखुदू हसतांना
-    नी पाऊसाच्या थेंबांना सशक्त झेलतांना

मी पाहिलं होतं त्याला
-    चिंब पावसामध्ये भिजलेला
-    आत्मविश्वासाने पूर्ण भरलेला
-    सर्व ऋतूंची मार सोसत वाढलेला
-    नी वाटसरूंची पावसात छत्री झालेला

मी पाहिलं होतं त्याला
-    पक्ष्यांसोबत मुक्तपणे खेळतांना
-    पिलांची सांभाळून काळजी घेतांना
-    घर बांधण्यास मदत करत असतांना
-    नी त्यांच्यावर आईसारखे प्रेम करतांना

मी पाहिलं होतं त्याला
-    लोकांचे तोंड गोड करतांना
-    लहान मुलांना अंगाखांद्यावर खेळवतांना
-    अखाजीच्या झुल्यांचा अनाद घेतांना
-    नी लाकूड तोड्याची मार डोळे बंद करून सहन करतांना

कवी – कल्पेश देवरे

केदार मेहेंदळे