माझी प्रिया गेली कुठे

Started by SANJAY M NIKUMBH, August 01, 2012, 09:14:31 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

काळ्याशार मोठ्या ढगान
चंद्राला झाकलं                          ;)
माझी प्रिया गेली कुठे
माझं मन घाबरलं
तिला पाहत मन
होत मग्न झालं
पापणी लवता माझी
ढग आडव आलं
ढगाला माहित होत
माझं रोजच जगण 
गच्चीवर येऊन
प्रियेला बघत रहाण
कावरबावर मन होताच
ढग गालात हसला
तुझं प्रेम पहायचं होत
म्हणत हळूच सरकला
माझ्या प्रियेचा चेहरा
पुन्हा मला दिसला
ढग चालत चालत
दूर निघून गेला . 

केदार मेहेंदळे