तुझ्याच पाठी पाठी

Started by SANJAY M NIKUMBH, August 01, 2012, 11:02:24 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

जेव्हापासून जुळल्या
या प्रेमाच्या गाठी
सतत मन धावत 
तुझ्याच पाठी पाठी
प्रत्येक क्षणी झुरत
माझं मन तुझ्यासाठी
कोठेही असलीस तरी येत
तुझ्याच  पाठी पाठी 
या हृदयातला गंध
फक्त प्रिये तुझ्यासाठी
हा वसंत घेऊन येतो 
तुझ्याच पाठी पाठी 
मनात उमलला मोर पिसारा
तुझ्यावरच्या प्रीतीसाठी
उरात ठेवण्यासाठी येतो
तुझ्याच पाठी पाठी 
प्रत्येक रात्र जागते
प्रिये तुझ्यासाठी
स्वप्नातहि पळत मन
तुझ्याच पाठी पाठी   
समजून घे माझी प्रीत
वेडी आहे तुझ्यासाठी
हे वेड लावून तुला
ये न माझ्या पाठी पाठी .

केदार मेहेंदळे