ऊठ माणसा ऊठ

Started by SANJAY M NIKUMBH, August 02, 2012, 10:33:53 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

एवढ्या मोठ्या चंद्राला झाकोळण्याची
सूर्याच्या प्रकाशालाही अडवण्याची
येते कुठून हिम्मत
एवढ्याशा या ढगात   
नाजूक असूनही पाकळ्या
भुंग्याला त्यात अडकवण्याची
ताकद कुठून येते
छोट्याशा फुलात
बलाढ्य हत्तीलाही नामोहरम करण्याच
सुचत कस मुंगीला
शिरून त्याच्या कानात
यावरून एकच दिसत
इवल्याशा गोष्टीतही सामर्थ्य असत
पण त्याची जाणीव यायला हवी मनात
मग माणसा तूच का रहातो शांत
तू पेटून का नाही उठत
जे सत्याच्या मार्गाने जातात
त्यांच्यापाठी का नाही चालत
असत्य अन अहंकाराच सिंहासन
कायम पोकळच असत
सत्य न न्यायासाठी झगडून
त्यास हलवायच असत
मान्य आहे सत्याला
खूप सहन कराव लागत
जेव्हा होतो सत्याचा विजय
मनामनात हसू पसरत
ऊठ माणसा ऊठ
स्वतःस सामान्य समजू नकोस
तुझ्यातही आहे अचाट  सामर्थ्य
ते न वापरता  मरु नकोस .

sujitmane