तू अन मी

Started by SANJAY M NIKUMBH, August 04, 2012, 05:42:04 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू अन मी
एवढच जगण 
तुझ्याच धुंदीत
माझं हरवण
दिवसाही तुझं
स्वप्न पहाण   
रात्रीच्या गर्भात
तुझ्याशी बोलण
थोड बेशिस्त
होत माझं वागणं
एकटा असतांनाही
मोठ्यान हसण
गर्दीतही एकांतात
तू सोबत असण
या जगात वावरूनही
जगासोबत नसण 
आवडत मला प्रिये
कुणी वेडा म्हणण
प्रत्येक क्षणी
तुझा होऊन जगणं .