जगेन मी

Started by sanjaymane 1113, August 04, 2012, 01:43:34 PM

Previous topic - Next topic

sanjaymane 1113


हसून साह्शील सहज वेदना
दु:खlला  सुख म्हणेन मी

तू चंद्राला दिनकर म्हणशील
तुझ्यासवे "मम" म्हणेन मी     

अर्थ नवा नात्याला देशील
श्वासाविनही जगेन मी   

स्वप्नांमध्ये रंग तू भरशील
नेत्रांविनही बघेन मी   

मागून बघ तू सहज एकदा   
चंद्र धरेवर  आणेन मी

प्रीतीस म्हणते नश्वर दुनिया 
सखी तुला मग  म्हणेन मी

---संजय माने ,श्रीवर्धन www.abhinavkalamanch.blogspot.com