" कविता "

Started by कवि - विजय सुर्यवंशी., August 05, 2012, 06:09:08 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


         " कविता "

कधी कधी मेघ बनुन,
     बरसतात कविता ...
कधी कधी सुमनासारखं,
    फुलतात कविता ....
ठेवणीच्या अत्तराप्रमाने,
   पसरतात कविता ...
पाणावलेल्या माझ्या नयनात ,
   तुझ्याचसाठी तरसतात कविता ...
तुझा अबोला माझा वेंधळेपणा,
   दोहोंमध्ये दुवा साधतात या कविता ....
यांत्रिकीकरनाच्या या जगती,
   नाती आपुली जपतात या कविता .....
स्तुतिसुमने उधळण्या तुझ्यावर,
   ओठी माझ्या दौडतात कविता ....
दुःख लपवुनी अश्रुंचे ओघळ दडवन्या,
    धाउनी येतात या कविता   
तुझ्या माझ्या रम्य भेटीला,
   अशा कशा सुचतात या कविता????   

                   कविवर्य - विजय अरुण सुर्यवंशी.
                                   ( यांत्रिकी अभियंता )


SANJAY M NIKUMBH


कवि - विजय सुर्यवंशी.


केदार मेहेंदळे