बाबा आता काढ की रे वीकेंड्ला कार

Started by shashaank, August 07, 2012, 02:51:55 PM

Previous topic - Next topic

shashaank

बाबा आता काढ की रे वीकेंड्ला कार
पाऊस कस्ला पडतोय बघ मस्त धुवाधार

वळणं वळणं घेत घाट रस्त्याने जाता
झोके घेत चाललोय अशी येते छान मजा

झुईं झूम कार अशी चालवशील ना रे
किती जोरात चालवतोस आई ओरडेल रे

दूर दूर पसरलेले हिरवे गार गवत
अधून मधून फुलांचीही दिसेल मग गंमत

डोंगरावर उतरतात कसे छान ढग
कधी येते धुके तर मधेच पाऊस सर

मज्जा येते बघताना हे किती किती रे
आई ताई आजीला ही घेऊन जाऊ रे

डोंगरातून धावते कसे फेसाळते पाणी
खळखळ खळखळ गाते कशी छानशी गाणी

धबधब्यात अशा मी न्हाणार आहे रे
पाण्यातही खूप वेळ नाचणार आहे रे

तिखटमिखट खमंग कणीस गरमशी भजी
आताच समोर दिस्तात कशी छानशी ताजी

भजी, कणीस, वडा नावं काढताक्षणी
सारं आठवून सुटलं की रे तोंडाला पाणी

सांगून ठेवतोय आताच मी हे याच शनवारचं
अज्जिबात नकोय तुझं ते "सॉरी" नेहेमीचं.....


-shashaank purandare.

केदार मेहेंदळे