प्रीत वेडी असते

Started by SANJAY M NIKUMBH, August 07, 2012, 10:30:03 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रीत वेडी असते हे
प्रेम करणाऱ्यालाच कळत
रात्रीची झोप त्याची
जेव्हा मन उडवत
दिवसाढवळ्या जागेपणी
तिचच स्वप्न पडत
ती दिसली तरी
मन नभात उडत
तिची चाहूल लागताच
सार अंग थरथरत
तिची भेट होताच
मन किती मोहरत
तिच्या हलक्या स्पर्शानही
मनाच रान बहरत
तिच्या डोळ्यात पाहतांना
मन स्वतःलाच विसरत
प्रीत वेडी असते हे
प्रेम करण्यालाच कळत
कारण तिच्या आयुष्यात येण्यान
जगणंच बदलून जात .