सत्याचे आकलन-जे .कृष्णमुर्ती कविता

Started by विक्रांत, August 08, 2012, 06:26:05 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

जे .कृष्णमुर्ती कविता -- मला उमगलेले कृष्णजी, हा कृष्णजीच्या तत्वज्ञानाचा मला झालेला बोध आहे .त्यावर टीका टिप्पणी नाही .ज्ञात अज्ञात मित्रांशी share करण्यासाठी हा प्रपंच .

सत्याचे आकलन
का असते जहांगिरी कुणाची
का मालकी कधी कुणाची
व्रतस्थ राहून वासनांचे
दमन करणा-या तापसांची
पुस्तकी ज्ञानाने वाकलेल्या
जड मतांध पंडिताची
गाडीवर बसून धनिक शिष्यांची
फौज उभारणा-या गुरूंची
तिथे नम्र अतिनम्र होऊन
बाहेर फुत्कारणा-या शिष्यांची

सत्याचा उदय होण्यास
कश्याचीही कुणाचीही
मुळीच गरज नाही
गरज आहे ती फक्त
स्वत:त असलेल्या तळमळीची
अन जाणवणाऱ्या तातडीची

सत्याच्या आकलनास हवे अंतर
अत्यंत नम्र ऋजू नितांत सुंदर
तितकेच दृढ आणि सशक्त
नाना मतांच्या गजबजाटात
नाना निष्टांच्या अरण्यात
न हरवता वाट जे राहते सदैव
शांत निस्तब्ध विमुक्त