प्रेमातलं अंतर

Started by SANJAY M NIKUMBH, August 09, 2012, 07:33:20 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेम कधीचं ठरू नये
फक्त शारिरीक आकर्षण
आकर्षणाला प्रेम
कसं म्हणता येईल                                                                                         
प्रेम कधीचं  ठरू नये
काहीतरी मिळवण्याचा मार्ग
जर स्वार्थ असेल तर
ते प्रेमच असत नाही   
आकर्षणाच प्रेम
जितक्या झरझर उंचावर जात
तेवढ्याच गतीने ते 
सरसर खाली येऊन जात
ज्याचं आकर्षण असत
त्याच्या द्रुष्टीने संपून जात 
पण जो भुलला असतो त्यास
त्याला बरबाद करून जात
म्हणून कितीही प्रेम असलं तरी
दोघात अंतर गरजेच असत
ते अंतरच दोघातलं
प्रेम फुलवत असत
खर प्रेम वासनेच्या
आहारी जात नसत   
प्रेमासाठी कितीही वेळ
ते वाट पाहू शकत
प्रेमात अंतरच ठेवलं नाही तर
ते प्रेमही संपून जात
ज्या प्रेमावर जगत असतो
तेच दूर निघून जात.