प्रेमात पडल्यावर

Started by SANJAY M NIKUMBH, August 12, 2012, 07:15:59 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेमात पडल्यावर
सारेच वेडे होतात
नभातल चांदण
तिच्या डोळ्यांत पाहतात
ती भेटता तिचा गंध 
श्वासात भरून घेतात
रात्री पापण्या मिटून
तिला पाहत रहातात
ती प्रत्यक्ष भेटल्यावर
अबोल होऊन जातात
बोलायचं ते राहून गेलं
म्हणून रात्र रात्र जागतात
तिला नजरेत साठवण्यासाठी
किती किती तडफडतात
तिच्या एका कटाक्षासाठी
किती किती झुरतात
तिच्या नुसत्या दिसण्यान
बेहोष होऊन जातात
तिच्या नुसत्या हसण्यान
नभात उडून जातात
खिशात पैसे नसले तरी
तिला बर्थडे गिफ्ट देतात
ती म्हणेल तसं
तिच्या तालावर नाचतात
ती रुसून बसल्यावर
देवदास होऊन जातात
तिला कसं मनवायचं
याचं टेन्शन घेतात
फक्त तीच असते मनात
स्वतःलाही विसरून जातात
प्रेमात पडल्यावर
सारेच वेडे होतात .


केदार मेहेंदळे


mangesh4025


Ganesh Surve




Critic