आठवणीत तुझ्या

Started by kalpana shinde, August 13, 2012, 12:19:25 PM

Previous topic - Next topic

kalpana shinde

तुझी आठवण येत नाही  असा
एकही क्षण असा जात नाही
तुझ्या आठवनिशिवाय माझा
श्वासही आता चालत नाही

का येवढ प्रेम तुझ्यावर
अजून मला  कळत नाही
डोळ्यातले माझे अबोल प्रेम
कसे रे तुला कळत नाही

बाहुपाशात शिरून तुझ्या
शेवटचे मला रडायचे  आहे
साठवून  ठेवलेले मनातले प्रेम
तुझ्यासमोर  मांडायचे आहे

माझ्या प्रेमासाठी तुला
पुन्हा मागे फिरायचे  आहे
अप्रूर्ण असलेला प्रवास आपला
पूर्ण दोघांनी करायचा आहे

एकदा भेट घडवायची आहे   
अशक्य शक्य करायचे आहे 
तरसली ज्या प्रेमासाठी मी
शेवट त्याचा करायचा आहे 

कल्पना एस (मोना)
(१२.०८.१२)