माफ कर ग मला......!

Started by Vira, August 19, 2012, 03:46:08 PM

Previous topic - Next topic

Vira

माफ कर ग मला......!




असच फीरत होतो,
घराकडे जात होतो.

येतांना मित्रांनी सांगीतल.
आज नविनच सकाळ झाली हे,
तुझ्या बाजुच्‍या गल्‍लीत एक
झकास आयटम रहायला आली हे.

सर्वकाम सोडून
आधी तीलाच बघायला गेलो,
बघीतलतर काय
च्‍यायला बघतच राहीलो.

बघीतल्‍या बरोबर मनात
घर करुन बसली ती,
जेव्‍हा माझ्याकडे बघुन
हळुच हसली ती.

आता माझ एकच काम असायच,
रोज सकाळ संध्‍याकाळ
तिलाच निहाडत बसायच.

आता माझ्या मित्रांना मला शोधन्‍यासाठी
जास्‍त त्रास नसायचा,
कारण माझा ठिंय्या
तिच्‍याच घरासमोर असायचा.

एके दीवशी मला ती
रडतांना दीसली,
माझ्याकडन पहावल नाही
जाऊन तीची हळूवार आसव पुसली.

ती घाबरली आणि घाबरुन म्‍हणाली
अरे तु कोण,
मीही घाबरत म्‍हणालो
मी तुझ एकतर्फी प्रेम.

तीने संतापात सांगीतले
मग एकतर्फीच राहू दे
मी करु शकत नाही,
अग असनकोग बोलु
मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही.

म्‍हणाली....
मला माहीतीहे तुझ्यासारख मुलांच फक्‍त
शरीरावरच प्रेम असतो,
तु अस कर...
माझ्याशिवाय जगु नाही शकत
तर मरुतर शकतो.

हसत उत्‍तरलो...
तुझ्यावरतर मी नेहमीच
प्रेम करत राहणार,
आणि आजपासुन कधी तुझ्या
वाटेत नाही येणार.

माझ तुझ्या शरीरावर प्रेम नाही हे कळल्‍यावर
जेव्‍हा तु पसतावशील,
तेव्‍हामात्र प्रेमाच्‍या शोधात
तु माझ्याजवळ येशील.

एकन्‍यात आल हे की
आज कुणास ठाऊक दोन महीन्‍यांनी
खुप वेळ झालीतरी ती
माझ्याजवळ येणार हे,
तीच्‍या वागण्‍याची माफी मागत
माझ्या छातीवर डोक ठेऊन
खुप रडणार हे.

वातावरण शांत होत
अचानक मधुनच कुणाचातरी रडण्‍याचा आवाज येतो हे,
बघीतलतर काय अरे
खरच ती आली हे,
आणि तीची पापनीही ओली हे.

ती रडत रडत माझ्याकडे
धावतच आली,
आणि मला जोरात
मीठी मारली.

पण आज मी तीच्‍याशी
थोडा रुसलो होतो,
ती दीवसभर माझ्या छातीवर डोकठेऊन खुप रडली
आणि मी काही न  बोलता
आरामाने तीरडीवर झोपलो होतो.

जिच्‍या डोळ्यात माझ्याने
कधीकाळी पाणीही नाही पहावल,
माफ कर ग मला
आणि मीच तुला रडवल.
माफ कर ग मला
मीच तुला रडवल. 

- विरा