प्रेम

Started by SATISHGAVHALE1970, August 23, 2012, 05:38:53 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

नेहमीच विचारायची ती मला
का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं
का ओढून घेतो मला
सागराच्या लाटा एवढं

नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला
स्वप्नातही माझ्या
फक्त तूच का दिसतो मला

वाटायच सांगाव तिला
अग वेडे
प्रेम काय सांगून केले जाते
बुडायला काय पाणीच लागतं
अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर 
चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात
पोर्णिमा आणि अमावस्येला

प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत   
तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते
म्हणूच सांगतो
माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत   -  सतीश लक्ष्मण गव्हाळे.
   




SWAPNIL KOLHAPURE