गंध तुझा

Started by SATISHGAVHALE1970, August 23, 2012, 07:20:40 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

गंध तुझा
तुझ्या येण्याने आयुष्यात माझ्या
जाई जुई बहरल्या
गंधहीन आयुष्य माझे
जणू
सुगंध पुन्हा एकदा बहरला

श्वासात मिळवूनी श्वास
ओठांवर स्पर्श तुझा
मोहरली सारी काया
वाटले मला
मोगरा पुन्हा एकदा खुलला

मोकळ्या केसात माझ्या
जेव्हा
श्वास तुझा अडकला
अमावस्येच्या रात्री
राजा
चांदण्या पुन्हा एकदा खुलल्या  - सतीश लक्ष्मण गव्हाळे