" परतलेला भात "

Started by हर्षद कुंभार, August 25, 2012, 11:46:29 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


                                             " परतलेला भात "

नमस्कार सगळ्यांना,
                            आज अजून एक वेगळा लेख. मी नेहमीच माझे स्वानुभव तुमच्याशी शेयर करत असतो. तुम्हीपण चवीने ते वाचता लाईक करता शेयर करता त्याबद्दल आभारी आहे.  तर आजचा लेख आहे तो एका खाद्य पदार्थाबद्दल.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या कवीला काव्य अन या गोष्टी सोडून मध्येच खायचे काय सुचले. पण खायचा पदार्थ तर ऐका आधी.
        हा पदार्थ आहे " परतलेला भात ". अर्थात आई लहानपणापासून जे म्हणत होती तेच नाव मीपण सांगत आहे. तुमच्या घरी याला अजून काही म्हणत असतील. पण एक गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रात हा पदार्थ लहान थोरापासून सगळ्यांना आवडणारा आहे. आधी लहान असताना आई बनवून देयची जेव्हा पासून नीट कळायला लागले मी स्वतः करायला लागलो. 
          हा भात करण्यासाठी मुख्य गोष्ट लागते ती म्हणजे रात्रीचा शिळा भात. आता तुमच्या चांगलेच लक्षात आले असेल मी कोणत्या खाद्य पदार्थाबद्दल बोलत आहे.  आधी मी माझी स्वतःची पद्धत सांगतो मी कसा बनवतो ते. 
चला तर मग करूया सुरुवात
साहित्य : रात्रीचा शिळा भात, २-३ हिरव्या मिरच्या, हळद , जिरे , मोहरी, शेंगदाण्याचा कुट, थोडेसे तेल.       
कृती : प्रथम शिळा भात जरा मोकळा करून घ्या. भातावर थोडी हळद टाकून जरा मिश्रण करून घ्या. कढईत थोडे तेल तापवून घेवून त्यात जिरे , मोहरी, आणि मिरची ही फोडणी तळा. आता . आता तो भात त्या कढईत टाकून मस्त फोडणीसोबत परतून घ्या.  त्या  नंतर त्यावर १-२  शेंगदाण्याचा कुट टाकून थोडा मिश्रण करून मंद आचेवर थोडा वेळ ठेवा की झाला तुमचा भात. 


  तर ही झाली माझी कृती प्रत्येकाची आपली वेगळी कृती असेल घरची. पण हमखास सगळ्यांच्या घरी होणारा हा पदार्थ आहे तर मित्रांनो माझ्या या लेखाशी सहमत असाल तर मलाही सांगा तुमचा अनुभव. चला काळजी घ्या. - तुमचा कवी हर्षद कुंभार
 
         

प्रशांत नागरगोजे

खरंच परतलेला भात मलाही आवडतो...

हर्षद कुंभार

haan Prashant, mala jevha watate tevha mi swataha banvun khato, i m lovin it

Vaishali Sakat

Mazhi kruti thodishi vegli aahe........pan partalela bhat malahi aavadato.......agadi tajya bhatapeksha............ :)

हर्षद कुंभार

haan vaishali, sakat, tujhi kruti share keli astis chan jhale aste na mi try keli asti ti, thanx for comment