तुझी नि माझी भेट

Started by Kranti S, August 26, 2012, 03:47:13 PM

Previous topic - Next topic

Kranti S

तुझी नि माझी भेट
होती एकदम सेट
न होती तू लेट
न होतो मी लेट

तो प्रसंग आला होता जुळून
हे मला आता कळले चुकून
तुझे येणे माझ्या जीवनात
हे देवाने ठेवले होते ठरवून

आपली भेट होणे
होता एक चमत्कार
कधी विचारही नसेल केला
कि बघेल मी तुझा सुंदर अवतार

त्या दिवशीची आपली भेट
होती काही वेगळी
डोळ्यातच तुझ्या
दिसली मला सुंदरता सगळी

त्या दिवशी
आपण घाई गडबडीत भेटलो
तो सुगंध तुझा
अजूनही माझ्या मनात दळवळतो

भेटण्यासाठी तुला
उभा होतो मी अवांतर
बघताच तुझी सुंदर छवी
विचार आला "काय बोलू मी नंतर"

आली समोर तू आणि
ओठावरचे  शब्द गेले पळून
तुझ्या डोळ्यात बघता
गेले माझे हृदय वितळून

तुझी नि माझी भेट
होती काही क्षणांची
आज आठवता ते क्षण
तेव्हा मौज होते या मनाची

ती भेट होती सुंदर
आज हे मला कळलंय
परत  कधी भेटशील ग
तुझ्यासाठी हे काळीज धडधडतय