होशील माझी ?

Started by atulmbhosale, August 31, 2012, 03:17:48 PM

Previous topic - Next topic

atulmbhosale

होशील माझी ?
होशील माझी ? या प्रश्नाचे
मुक्यामुक्याने दिलेस उत्तर
अन दोघांच्या डोळ्यांमधुनी
हवेहवेसे झरले अत्तर......

आठवते का? कुंद हवेने
ढगास वरती पिडले होते
भाव मनीचे भिजल्या देही
मनी कसे अवघडले होते?
तुला स्पर्शुनी धुंद हवेने
गंध घेतला दरवळणारा
निसर्ग अवघा खुळा  जाहला
भास नव्हे तो छळ  - छळणारा
'नाव तुझे गं?' प्रश्नाचे तव
अधीरतेने दिलेस उत्तर
अन दोघांच्या डोळ्यांमधुनी
हवेहवेसे झरले अत्तर......

नकोच होते अंतर कुठले
नकोच होता जरा दुरावा
दूर कुणाचा अखंडतेने
वाजत राही सुरेल पावा
कुणास नियती सुखे पावली ?
इथल्या वाटा खडतर खडतर
या प्रेमाचे  वसन रेशमी
त्यांस आतुनी संकट अस्तर !
'देशील सोबत ?' तुज प्रश्नाने
कमी जाहले बरेच अंतर
अन दोघांच्या डोळ्यांमधुनी
हवेहवेसे झरले अत्तर......

रंगीत झाले आकाश इथले
रंगीत झाल्या सुरेल वाटा
तुझ्या संगती अमृत होईल
वाटेवरचा जहरी काटा
वाळूवरती किती लिहावे?
लाटेसरशी पुसून जाते
हात तुझा या हातामधला
कधी न जावा सुटून वाटे
'नकोत वळणे नकोत फाटे'
दो हृदयांचे एकच उत्तर
तव दोघांच्या डोळ्यांमधुनी
हवेहवेसे झरले अत्तर......
  अतुल भोसले (कोल्हापूर)
  ८८८८८६२७३७

anil waghmare

khuuuup chaan kavita.
   
     tumachya blog varil sarv kavita chaan aahet.

         changalya kavitaa vaachayala dilyabaddal aabhari aahe.

          Anil Waghmare
                    pune.


atulmbhosale


खूप खूप धन्यवाद.

SUKUMAR NAANE

CHAANGALAA PRAYATN AAHE
   GOOD ONE