तो लाल गुलाब

Started by Kranti S, September 02, 2012, 04:19:11 PM

Previous topic - Next topic

Kranti S

करू नाही शकलो कधी व्यक्त
माझ्या मनातल्या अनमोल भावना
भेटायचं तर दूरच
आपण कधी बोललो कि नाही हे सुद्धा मला आठवेना

आज तुला बोलणारच
असा निश्चयच केला
दोन पानच प्रेमपत्र
शेवटी पाण्यातच गेल

एकदा तुझ्या केसातून पडलेला गुलाब
आठवतो का तुला
जपून ठेवलाय तो मी अजून
कधी देऊ शकलो नाही मी तुला

कधी समजणार तुला
माझ्या या भावना
कसा सांगू तुला हे
आता हे दुख: मला सोसवेना

कॉलेज मध्ये असताना
नेहमी तुझ्याकडेच बघायचो
फक्त तुला बघण्यासाठी
दररोज लवकर कॉलेज मध्ये यायचो

कॉलेज संपले
पण व्यक्त करू शकलो नाही माझ्या भावना
भेटशीलच कधीतरी तू
तेव्हा प्रेमाने करेन तुझा सामना

:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
[/size][/color][/center]

प्रशांत नागरगोजे

छान... :)
तुमचं कॉलेजातल हाय अन् आमचं गावातलं.

Kranti S