खऱ्या जगण्याचा अर्थ

Started by SANJAY M NIKUMBH, September 08, 2012, 09:47:45 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

खूप झाले कवी
न कितीतरी होतात
प्रेमात पडून कुणाच्या
कविता करत राहतात
खूप करून कविता
ते  लिहिणं थांबवतात     
कधी लिहित होतो
हे हि विसरून जातात
कारण काळाच्या ओघात
प्रेम ओसरून जात
त्या प्रेम भावनेला
ओहोटीन घेरलं जात   
पण माझं प्रेम कधीच
ओसरू शकणारं नाही
हि प्रेम भावना
मनातून कधीच जाणार नाही
कारण मला कळलाय
खऱ्या जगण्याचा अर्थ
प्रेम भावना नसेल तर
जीवन आहे व्यर्थ
हे प्रेम असंच
नसानसात वहात राहीन
अखेरच्या श्वासापर्यंत
प्रेम कविता करत राहीन
माझं प्रेम आहे
हृदयात खोलवर रुजलेलं
एका हृदयावर भाळून 
त्याचा वटवृक्ष झालेलं
या प्रेम भावनांना शब्दात
मी मांडत राहीन
माझं प्रेमच पुरवेल शब्द
मी फक्त लिहित राहीन .