आवर मोह कार्टून काढण्याचा

Started by केदार मेहेंदळे, September 10, 2012, 04:14:50 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

काल मुंबईत पोलिसांनी कार्टुनिस्ट त्रिवेदी यांना अटक केली. National emblem ची विटंबना केल्याचा त्यांच्या वर आरोप आहे. मला वाटतं हा विपर्यास आहे. त्यांनी त्यांच्या कार्टून मध्ये सिहा ऐवजी कोल्हे दाखवले आहेत आणि 'सत्य मेवं जयते' ह्या वाक्यांच हि विडंबन केलं आहे. मला वाटतं त्याना काय म्हणायचं आहे ते महत्वाचं आहे. पण त्यांच्या वर गुन्हा नोंदवला गेला आहे. त्या वरून मला हे विडंबन काव्य सुचलं आहे.

पाहिजे तर कर आदर्श घोटाळा
किंवा कर कोळसा  घोटाळा
2G, 3G सुध्धा चालेल पण
आवर मोह कार्टून काढण्याचा

पोलीस येतील घरी अचानक
पकडून नेतील तुला सहजच
राष्ट्रद्रोहाचा आहे हा गुन्हा
आवर मोह कार्टून काढण्याचा

इंग्रजांनी हा कायदा बनवला
देशबांधवा विरुध्ध वापरण्या
आहे अजूनही तो जिवंत बाबा
आवर मोह कार्टून काढण्याचा

लोकशाही मध्ये आहेत Fundamental Rights
Freedom of Expression त्यात नाही
आता तरी येड्या समजून घे जरा
आवर मोह कार्टून काढण्याचा

मनमोहन जी असोत वा  ममता दीदी
लोकशाही पेक्षा उंच त्यांची छबी
त्यांच्या छबीला लावू नकोस धक्का
आवर मोह कार्टून काढण्याचा

Chief Minister, Prime Minister
लोकशाहीत आहेत सिकंदर
आता तरी घे समजून माकडा
आवर मोह कार्टून काढण्याचा

संसदेत लागेल तर कर  राडा
माईक फेकून मार दुसर्याला
चितारू  मात्र नकोस सिहा ऐवजी कोल्हा
आवर मोह कार्टून काढण्याचा

पाहिजे तर मार फेकून चप्पल
किंवा फोड सरळ कुणाचेही कानफड
सगळं काही चालेल या देशाला, पण
आवर मोह कार्टून काढण्याचा

R K Laxuman कार्टुनिस्ट न्हवते
ते तर समाज विघातक चित्रकार होते
जाऊ नकोस तू त्या रस्त्याला
आवर मोह कार्टून काढण्याचा

नारा आपला आहे "India Shining"
"Cole Gate" आसो वा असो "Mining"
Shining Shining चा फक्त दे तू नारा
आवर मोह कार्टून काढण्याचा

म्हणायचं असतं तुला काही
समजतात ते भलतं काही
खायला लागेल तुरुंगाची हवा
आवर मोह कार्टून काढण्याचा

आधी Professor आता त्रिवेदी
दोघे झाले तुरुंगात भारती
जाळून टाक कागद पेन्सिल आता
आवर मोह कार्टून काढण्याचा


केदार....






atulmbhosale

agadich satya maandalet kavitet.

    bharat kadhi badalnaar aahe kunaas thauk.