प्रेमानेच मन जिंकाव

Started by SANJAY M NIKUMBH, September 10, 2012, 11:31:29 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

आवडलं कुणी तर
वेड होऊन जावं 
झपाटल्यासारखं
प्रेम करावं
बेधुंद होऊन
तिच्यावर मरावं
फुलासारखं
तिला जपावं
तीच सार दुखः
ओंजळीत घ्यावं
तिची ढाल बनून
आयुष्य जगावं
फक्त प्रेमासाठीच
जगण होऊन जावं   
आपल्या प्रीत गंधाने
तिला फुलवावं
तिला वेड लागेल
इतकं प्रेम करावं
प्रेमानेच तिचही
मन जिंकाव .

केदार मेहेंदळे