बौद्धिक अपंगत्व

Started by शिवाजी सांगळे, November 17, 2026, 10:03:56 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बौद्धिक अपंगत्व

नुकतंच युट्युबवर पाहण्यात आलं की A I चा बाजार लवकरच उठणार आहे, A I चा खेळ संपणार, A I मुळे अमुक होणार, तमुक होणार वगैरे! खरं तर ती सारी चर्चा A I कंपन्याच्या आर्थिक गुंतवणुक, व्यवहार, जागतिक शेअर बाजाराच्या अनुषंगाने, तसेच मोठमोठ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या संदर्भात असावी असे वाटते, खैर तो आपला प्रांत नाही.

वैयक्तिक पातळीवर विचार करता, मला वेगळीच भीती जाणवते, ती अशी की आजकाल आपल्याकडील बऱ्याच समाज माध्यमांमधून, मोठमोठ्या नट, नट्या, खेळाडूं मार्फत A I कंपन्यांचं उदातीकरण होऊ लागलेल आहे, जसं की xyz A I ला तुमच्या समस्या, प्रश्न विचारा आणि त्यावर उत्तरे, तोडगे, सल्ले मागवा वगैरे, काळाची गरज म्हणून कधी तरी, काही गोष्टी, काही प्रमाणात योग्य असू शकतात हे खरं, परंतु गंभीरपणे जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की असे छोटे छोटे प्रश्न विचारून माणूस स्वतःच्याच बुद्धीला काम न देता अकार्यक्षम करू लागतो आणि परावीलंबी होऊ लागतो.

संरक्षण, सुरक्षा, वैद्यकीय इत्यादी क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात याचा वापर योग्य वा आवश्यक असू शकतो, गणितं सोडवायला, साधा ई मेल लिहायला A I ची मदत म्हणजे अती होतं असं वाटतं, असल्या दैनंदिन समस्यांमध्ये याचा किती वापर करायचा याचा प्रत्येकाने विचार करायला हवा, अन्यथा एक दिवशी आपणच आपली बौद्धिक क्षमता विसरून जाऊ, आणि एक वेळ अशी येऊ शकते कि आपण या तंत्रज्ञानावर इतके अवलंबून राहू की स्वतःचा विचार स्वतः करू शकणार नाही

आज सर्रासपणे बऱ्याच क्षेत्रांमध्ये A I चा वापर होऊ लागला आहे. ठोस अशी आकडेवारी सांगता येणार नाही, परंतु बऱ्याच कंपन्यांमध्ये खूप लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत, किंबहुना मोठ्या प्रमाणात ले ऑफ झालेले आहेत. भीती अशी आहे की जर हे असंच चालत राहिलं तर एक दिवस माणसाला बौद्धिक अपंगत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही, जरी या A I चा जन्म माणसाच्या बुद्धिमत्तेतून झाला असला तरी.

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९