बघ कधी

Started by Sameer Nikam, September 21, 2012, 02:48:43 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

बघ कधी माझ्याकडे एक  प्रेमळ नजरेने
दिसेल तुला माझी हि वाट पाहणारी नयन आशेने

बघ कधी पकडून माझा हि हातात हात
जाणवेल तुलाही माझीच आहे  तुला  आयुष्यात साथ
 
बघ कधी येवून माझ्या लहानग्या झोपड्यात
उमजेल तुला  नाही असे सुख तुझ्या  राजवाड्यात
 
बघ कधी माझ्या घरची खावून भाकर
नाही वाटणार तुला पंच पकवान याहून रुचकर
 
बघ कधी मलाही मिठीत तुझ्या  घेवून
बसशील  मग स्वतःला माझ्यात हरवून
 
बघ कधी माझ्याही केसात हात प्रेमाने फिरवून
नाही जमणार  तुला कधी जावे मला सोडवून
 
बघ कधी प्रेमात माझ्याही पडून
पसरशील देवा कडे पदर  सातजन्म मीच मिळावा म्हणून
 
बघ कधी माझ्याशी हि नात जोडून
वाटेल राहावे माझ्या खुशीत सगळे सोडून


कृपया कविता वाचल्यावर आपल्या प्रतिकिया द्याव्या कारण मी या क्षेत्रात नवीन आहे धन्यवाद
समीर स निकम 

Sameer Nikam

कृपया कविता वाचल्यावर आपल्या प्रतिकिया द्याव्या कारण मी या क्षेत्रात नवीन आहे धन्यवाद
समीर स निकम 

yuvrajpatil001


Kiran Kadam.


Sameer Nikam