विनंती आई बाबास

Started by Sameer Nikam, September 21, 2012, 02:54:25 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

दिले कितेक मुलांना नकार  लग्नास
तरीही कसे नाही कळले तुमच्या मनास.

हसत खेळत पाठवा मला त्याच्या घरी नांदायला
का मला भाग पाडता पळून जायायाला

देते वचन मी तुम्हाला नाही जाणार मी पळून
कारण नाही झाले कोणाचे बरे आई वडिलांना फसवून

पण आतातरी हट्ट सोडा ..
जाऊ द्या कि माला वेळ जातेय सरून
तो आशेने वाट पाहतोय कितेक दिवसापासून

प्रियकर हि आहे मराठी
तरीही का घालता तुम्ही  आढ काठी

झाले आहे आधीच आयुष्याचे खेळ खंडोबा
बस झाले आता..
तुम्ही तरी समजून घ्या आई बाबा

नको दुसऱ्याची माला जीवनात साथ
लाडक्या प्रीयकाराचाच हवाय हातात हाथ

कृपया कविता वाचल्यावर आपल्या प्रतिकिया द्याव्या कारण मी या क्षेत्रात नवीन आहे धन्यवाद
समीर स निकम