असंही असतं प्रेम

Started by SANJAY M NIKUMBH, September 21, 2012, 08:07:08 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

कधीच ती आपली
होऊ शकणार नाही
आयुष्यात कधीही
येऊ शकणार नाही
हे माहित असूनही
प्रेम करत राहायचं
तिला जीवापाड
जपत राहायचं
अपेक्षा न ठेवता
निरागस मन ठेवायचं
तिच्यावरच्या  प्रेमासाठी
तिच्या आठवणीत जळायचं
कितीही झुरल मन 
तरी अंतर ठेवायचं
प्रेम म्हणजे काय
तिला दाखवून द्यायचं
रात्र रात्र जागून
अश्रुना वाट करून  द्यायचं 
तिला भेटतांना मात्र
ओठांवर हसू ठेवायचं
फक्त तिच्यासाठीच जगण
स्वतःलाही विसरून जायचं
तिच्या प्रत्येक आठवणींना
शब्दांच्या माळेत गुंफायच 
असंही असतं प्रेम
ती जीवनात आल्यावर कळलं
काय करू तिच्यामुळेच तर
प्रेम काय असतं हृदयाला कळलं .