हसली की फसली

Started by SANJAY M NIKUMBH, September 22, 2012, 11:22:46 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

हसली की फसली

हसली की फसली
असं मुलं समजतात
येथेच मुलींसमोर
ते खुळे ठरतात 
ते मुलींचं मन आहे
हे ते विसरतात
उगीच मनास वेड लावून
नभी उंच उडतात
पण तेच बिच्चारे
अन वेडे ठरतात
जेव्हा मुली त्यांना
मित्र आहे सांगतात
मुलीच हल्ली मुलांना
मस्त उल्लू बनवतात
एकावेळी कितीजणांना
वेडी आशा लावतात
मुले नुसतेच मुलींना
स्वप्नात घेऊन फिरतात
म्हणूनच मुली अभ्यासात
मुलांच्या पुढे असतात
मुलांनी मुलींच्या मागे
नुस्तच धावायचं नसतं
तीच मन ओळखल्याशिवाय
प्रेमात पडायचं नसतं 
प्रेमात पडलं तरी
करियर बघायचं असत
कारण त्यामुळेच तर
जीवन सुंदर होणार असत . 
                                               दि. २१.०९.१२ वेळ : ९.३० रा.
                                          संजय एम निकुंभ, सागर शेत , वसई