माझ्या मनातली शाळा...""

Started by yuvrajpatil001, September 23, 2012, 07:07:30 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

स्वैर झालोय वाऱ्यासारखा ..,
प्रेमात पडलोय खुळ्यासारखा...

असा नाद जडलाय तिचा..,
जसा बर्बाद झालाय जीव माझा...

तमा नाही कशाची..,
ना खाण्याची ना पिण्याची...

तमा आहे फक्त
सारकाही तिच्यावर लुटविण्याची
अन स्वताही लुटून जाण्याची...

कोण जाणे कशी जुळली.. ही प्रीत मला.,,
मनातल्या मनात बसली होती एक 'शाळा'

माझच मन..शिक्षक बनून मला प्रश्न विचारत होते..,
कारे..,प्रेम करतोस तिच्यावर का बोलतोस फक्त खोटे...??

प्रेमाचा 'गृहपाठ' करणं गरजेच झाल होत..,
तिला काय आवडतं...अन...काय नाय आवडतं..,
हे जरुरी बनलं होत...

खेळाचा तास तेव्हा सुरु होतो..,
जेव्हा रात्री गाढ झोपेत असतो...
अन..अहोरात्र आठवनिंचा लपंडाव चालू राहतो...

उन्ह वर आल्यावर...वास्तवाच दर्शन घडते..,
ती दिसेनासी झालेली असते..
ना जाणे ती कुठे लपलेली असते..
का खरचं...शाळा संपलेली असते..???

"प्रेमाचं" हे असच असते..,
ती सोबत असो.. ना असो
पण..,,
माझ्या मनातली शाळा अशीच भरलेली असते...""


Yuvraj Patil...""

केदार मेहेंदळे



SUKUMAR NAANE

ASHI MANAAT SHAALAA KARATAA?

   CHAAN KAVITAA
MANATALYA SHALECHI UPAMA AAWADALI


sambhaji shile

  MAZYA MANATLI SHALA HI SHICH HOTI PAN KAI HATI FAQT VIRAH ALA