ऐकल होत..प्रेम अस असत...""

Started by yuvrajpatil001, September 25, 2012, 10:37:02 AM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

ऐकल होत..प्रेम अस असत..,,
ती समोर आल्यावर काहीच सुचत नस्त
माहित नव्हत ..,,
ती नसताना मन नेहमी उदास असत

ऐकल होत..प्रेम अस असत..,,
सारख तिच्या विचारात गुंतून रहाव...
माहित नव्हत...,,
कि..,,या विचारांचा कधीच होणार नव्हता 'अस्त'...

ऐकल होत..प्रेम अस असत..,,
तिच्या एका हास्याने ...भूक क्षमते ...
माहित नव्हत...,,
तिच्याविना माझी भूकही उपाशीच राहते...

ऐकल होत..प्रेम अस असत..,,
रात्रभर झोप नाही लागत ...
माहित नव्हत...,,
कि..,,रात्रभर रात्रही नाही झोपत...

ऐकल होत..,,
प्रेम खूप आल्हाददायी असत...
माहित नव्हत..,,
कि..,ते इतक वेदनाही देत..

फक्त ऐकल्याने काही होत नसत...
कुणालाही ते होत नसत..
आणि ज्याला झाल..,,
त्यालाच ते छळत असत
अस हे प्रेम असत..""


युवराज...""

केदार मेहेंदळे