मॉल संस्कृती

Started by SANJAY M NIKUMBH, September 27, 2012, 06:15:47 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मॉल संस्कृती

पूर्वी बंर होत की  नाही
आई सांगायची
जा रे त्या वाण्याच्या दुकानात
अमुक वस्तू घेऊन ये
तेवढीच वस्तू आणायची
बाकी दुसरीकडे बघण्याची
गरजच उरायची नाही
त्या वस्तुपुरता लागतील
तेवढेच पैसे घेऊन जायचे
त्यातन उरले तर एक चौकलेट घ्यायचे
पण तो आनंद काही वेगळाच होता
आता जागोजागी मॉल आलेत
पण चार वस्तूएवजी दहा घेऊन येतो
अन याची खरचं गरज होती का
याचा विचार करत बसतो
मग का घडलं असं काय होऊन गेले
का असे मी पैसे उधळले
तेव्हा चूक लक्षात आली
लागतील तेवढेच पैसे मी नव्हते नेले
पण या मॉल संस्कृतीने हेच तर आहे ओळखले
म्हणून त्या झगमगाटात कुणीही हरवून जातो
न ज्याची खरचं गरज नाही ते हि घेऊन येतो
आता कितीही कॅडबरी आणलेत तरी
त्याला त्या  चौकलेटची सर येत नाही
न काहीही झालं तरी
वाण्याच दुकान डोळ्यासमोरून जात नाही .
                                                                संजय एम निकुंभ .वसई

विक्रांत

#1
agdi khar aahe