गुंफुनी हे धागे प्रेमाचे...

Started by Sadhanaa, October 02, 2012, 12:08:47 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa


गुंफुनी हे धागे प्रेमाचे...

मनीं न आले होईल कधीं                       
भेट जीवनी आपुल्या दोघांची ।
स्वप्नींही न आशा होती दिसली
हृदयीच्या ओळखीची ।
आतां परंतु नुरली शंका
अव्यक्त तव हृदयाची ।
म्हणुनि लागली आस मनीं
भंगलेले हृदय दाविण्याची ।
सोसले कष्ट मुग्धतेने
आजवरी जें जीवनांत ।
तें दाविताची करून उघडे
पडे उतार मम दुःखात ।
यत्न करूनही कधीं न बोलले
पहिल्या आपुल्या भेटीत  ।
हृदय यातना न जाणल्या तर?
हीच भीती उभी मनांत ।
तुझ्या गोड सहवासात
मी रंगून गेले आहे
दुःखाचा लवलेश नाहीं
सुख फक्त राहिले  आहे ।
जाणलेस तू सहजतेने
हृदय माझे भंगलेले
अन हळूच मला प्रेमाने
आपल्या हृदयाशी घेतले ।
मला जवळी घेउनी तूं
दुःख माझे दूर केले
गुंफुनी हे धागे प्रेमाचे
जीवनांत सुख निर्मिले । ।
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post.html