मेघझुला

Started by swatium, October 03, 2012, 10:28:26 AM

Previous topic - Next topic

swatium

मेघझुला
अचानक आज
दु:ख हद्दपार
मेघ ...आकाशपार
सुगंध वलयात आकाश निळेशार
चंद्ररसात चांदण्यांचा पाउस
चन्द्रमाही धुंद आज
पावलाखाली झुलतोय मेघझुला
आकाश माझं
चांदणं माझं
चांदवाही माझा
तरी सुगंधाच्या उगमाच्या शोधात
बेजार मी
आणि हा सुगंध .....हा तर
चक्क
माझ्याच तळातातून पझारतोय....!
...........................स्वाती मेहेंदळे