मी फक्त प्रेम करतं गेलो

Started by SANJAY M NIKUMBH, October 07, 2012, 08:05:42 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी फक्त प्रेम करतं गेलो

मी जिच्यावर प्रेम केलं
तिचं शरीर कधी दिसलंच नाही
त्यामुळे शरीराची आसक्ती
मनात कधी उफाळलीच नाही   
मी फक्त नकळत गुंतत गेलो .............
तिच्या टप्पोऱ्या सुंदर डोळ्यांवर
तिच्या लांबसडक कुरळ्या केसांवर
कधी घातलेल्या मोहक अंबाड्यावर 
तिच्या मधुर हसण्यावर
न हसण्यामुळे खूप गोड दिसण्यावर .
मी फक्त प्रेम करतं गेलो ...................
तिच्या निरागस असण्यावर
न भेटलल्या निष्पाप भावनांवर
तिच्या माझ्यावरच्या विश्वासावर
माझ्या निरागस स्पर्शाच्या तिच्या जाणीवेवर
हातात हात देऊन स्तब्ध बसण्यावर
न वेडा आहेस तू या बोलण्यावर .
मी कधीच गुंतणार नाही या शब्दांवर
न मी अबोल होताच साद घालण्यावर
तिच्या वेदनांवर फुंकर मारतांना ती गप्पं बसण्यावर
माझ्या प्रेमाला तिच्या मनानं समजून घेण्यावर
माझ्या आठवणीत व्याकूळ झालेल्या तिच्या नजरेवर
तिच्या दगडांपेक्षाही पाषाण मनावर 
अन तितक्याच सुंदर हृदयावर
माझी नजर फक्त
तिचं मन , हृदय , न आत्म्याकडे होती
माझ्या प्रीतीला वासनेची किनारही नव्हती       
म्हणून तर तिचं शरीर
मला कधी दिसलंच नाही
न माझं प्रेम पाहून ती केव्हा गुंतली
हे तिलाही कळलं नाही
हा प्रीत गंधच तर मनांना गुंतवून ठेवतो
न तिच्या आठवणीत मी बेधुद जगत राहतो
जे मला हव होतं ते प्रेम मला मिळालंय 
आता कुठलीही आस नाही खंर प्रेम मला कळलंय .
                                                                      संजय एम निकुंभ , वसई
                                                                   दि. ७.१०.१२ वेळ : ६.१५ संध्या .