तिला आवडतं माझ्याशी बोलायला !!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 08, 2012, 01:52:02 PM

Previous topic - Next topic
तिला आवडतं माझ्याशी बोलायला
कारण मी बोलका आहे
तिच्या  मनातला समजत  नाही तिला
मी  बोलून  जातो 
तिच्या एक  एक विचारांची वहीच  मी  उघडतो ..

ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी 
मी खूप एकटी आहे रे
आपल्यांमध्ये असूनही मी खूप परकी आहे रे
तुझे  बोलणं आपलं  वाटतं
मग तिला माझ्या मिठीत  मी घेतो
तिचाच मी असण्याचा भास मी तिला  देतो ..

तिला तसे गाणी खूप आवडतात
प्रेमात पडली आहे सांगून  ओठांवरही तिच्या  येतात
कधी  तर ती माझ्यासाठी हि गाणी  बोलते
काही  कविता ती माझ्यावर हि लिहते
मग वाटतं हेच ते प्रेम जे आयुष्यात एकदाच भेटतं ..

ती सतत  माझ्याच विचारात असते
रात्री अपरात्री हि  एकदा फोन करत असते
झोप नाही लागत म्हणते मला कुशीत तुझ्या घे ना
माझ्या खांद्यावर  डोकं ठेवून सुखाने ती झोपते
सकाळी म्हणते मला  सोडून तर जाणार नाहीस ना
नको रे जाऊस सोडून
तू माझा आहेस ह्या आशेवरच तर मी जगते ...

खूप  सुंदर आहे ती
अन प्रेम हि खूप करते
माझ्या फिकिरीत येणारे एक एक अश्रू  तिचे  हे सांगते
म्हणूनच तर ....
माझाही  जीव  तिच्यात  दडलाय ....
-

© प्रशांत शिंदे
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•.
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे








Kranti S



chan....khup lucky ahat tumhi.... :) :) :) keep on writing good poems...!!!
dhanyvad kranti :)