भेट आपुली...

Started by Sameer Nikam, October 08, 2012, 03:12:10 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

भेट आपुली...

 
भेट आपुली घडती  सांजवेळी 
पाही वाट मी त्या क्षणाची
नदी काठच्या किनाऱ्या जवळी
जिथे नसते दरवळ कुणाची

तुला भेटावयाचे स्वप्न रंगुनी
पाही वाट आतुरतेने सांजवेळची
दाखवी दिवस मला चीडवूनी
जणू सांगे नाही हि वेळ भेटण्याची

सूर्य आलाय आता मावळायला
हवेत हि पसरू लागली गुलाबी हवा
झालो सज्ज तुला भेटायला
वाटे मिलनाचे तो क्षण लवकर यावा

लगबग येताना पाहिले  तुला
तेव्हा तुझ्यात हरवताना
जाणवले  मी स्वःताला

आहे वेगळीच जादू सायंकाळची
आली ती वेळ मिलनाची
दोन वेड्या मनाची


समीर सु निकम


Sameer Nikam