आज असे गुरुवार...

Started by Sadhanaa, October 11, 2012, 07:45:10 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa


आज असे गुरुवार...

आज असे गुरुवार   वार श्री दत्त गुरूंचा 
आणिक तसा आहे हा वार श्री साईनाथांचा ।
पूजा अर्चा करोनिया  दिनारंभ  हा करावा
जप जाप्य करोनिया  देव चित्तांत भजावा ।
सदगुरू साईनाथांचा ।  आज करिता भक्ती
लाभेल जीवाला तुमच्या  स्थैर्य नि शांती ।
घडेल न त्यामुळे काही  कार्य आज अनीतीचे
धजेल ना आज कोणी करण्या वाईटही तुमचे ।
श्री प्रभूच्या प्रसादाने  स्थिर शांती मिळेल मना
म्हणुनी शिकवा आज  महिमा प्रभू भक्तीचा जना ।
घडेल जेव्हां सत्कृत्य  तुमच्या या हातून
समजा आणले हे ते  प्रभुनेच घडवून ।
करावे हे सत्कृत्य  परि न व्हावे त्याचे धनी
तोच घडवितो सारे  हींच भावना धरी मनी ।
मानव एक बाहुले नुसते  भगवानाच्या हातातले
करुनी घेई मनुजा कडूनि विचार त्याच्या मनातले ।
असता सत्य हे उघड  कां गर्व मनीं धरी फुका
नेत्रांवरती घेऊन झापड  चुकल्या वाटे जाऊ नका ।
प्रभू श्रद्धेचा दीप हाथी  घेओनी जरी तुम्ही चालला
येतील जरी काही संकटे  पार करुनी रहाल मार्गाला ।
म्हणोनी आज तुम्हां सांगतो दर गुरुवारी श्री साई भजा
दिनचर्येच्या आधी आणि श्री सदगुरुची करा पूजा ।।
रविंद्र बेन्द्रे         
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_8817.html